Nashik ZP Recruitment: विस्तार अधिकारी पदासाठी एक हजार जणांनी दिली परीक्षा!

Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP Recruitment : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतर्फे रविवारी (ता. ८) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठीची परीक्षा सात केंद्रांवर सुरळीत पार पडली.

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठी एक हजार २८१ पैकी एक हजार १३ परीक्षार्थी उपस्थित होते; तर २६८ गैरहजर होते. ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील आठ पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे. (Nashik ZP Recruitment 1000 candidates appeared for post of Extension Officer)

त्या अनुषंगाने रविवारी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी परीक्षा पार पडली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीही सर्व परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. सर्व केंद्रांवर मोबाईल जॅमर यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतची खात्री जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात येत होती.

काही परीक्षा केंद्रांवर अस्वच्छतेबाबत प्रशासनाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर स्वच्छता करण्याबाबतच्या सूचना श्री. परदेशी यांनी दिल्या होत्या.

Nashik ZP News
ZP Bharti Exam : 460 उमेदवारांनी दिली परीक्षा; 313 परीक्षार्थींनी मारली दांडी

अंजनेरी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यावर अधीक्षक अभियंता (वीज) यांनी तातडीने पुरवठा सुरळीत केला. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.

आता १० व ११ ऑक्टोबरला विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पाच पदांसाठी परीक्षा होणार आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली.

Nashik ZP News
Nashik MD Drug Case: नाशिक बनतेय MDचा अड्डा? औद्योगिक वसाहतीतील गाळ्यांवर करडी नजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com