
Nashik ZP School : बदलापूर येथील नामांकित शाळेत मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर शाळांमधील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही आहे. मात्र, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या एकाही प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. तसेच शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना केली आहे. परंतु, स्थापन झाल्यापासून येथे तक्रारी प्राप्त झालेल्या नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. ( zp school daughter unsafe due to deprived of cctv )