Nashik ZP School: जि. प. तील शिक्षकांच्या रिक्त पदांवर D. Ed., D. T. Ed. धारकांना मानधनावर घ्या

Teacher
Teacheresakal

Nashik ZP School : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदावर निवृत्त शिक्षक मानधनावर घेण्याऐवजी डी.एड. व डी.टी.एड. झालेल्या सुशिक्षित, बेकार उमेदवारास मानधनावर संधी द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली.

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ही माहिती दिली. (Nashik ZP School fill up Vacancies for teachers Hire DEd DTEd holders nashik)

राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. ही पदे रिक्त असल्याने त्यांचा गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. या रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षकांतून भरती करण्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला.

या निर्णयास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला असून, मानधन तत्त्वावर निवृत्त शिक्षकांना घेण्याऐवजी राज्यात लाखो उमेदवार डी.एड. व डी.टी.एड. पूर्ण झालेले आहेत. मात्र, त्यांना नोकरी नसल्याने ते बेकारीचे जीवन जगत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
Wani Accident News: जखमींच्या मदतीसाठी धावले शेकडो हात! आपत्ती निवारण पथकासह नांदुरी, वणीच्या ग्रामस्थांची मदत

त्यांना मानधन तत्त्वावर शाळेत अध्यापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राज्य शाखेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे, एन. वाय. पाटील, बाळासाहेब झावरे, आप्पासाहेब कूल, म. ज. मोरे, आबासाहेब जगताप, पोपटराव सूर्यवंशी, उत्तमराव वायाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Teacher
Nashik: सेवाकुंज चौकातील रस्त्याची दुरवस्था; अंदाजपत्रकात रस्ते दुरुस्तीकरिता 12 लाख रुपयांच्या निधीची तरतूद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com