Nashik ZP School News : विद्यार्थ्यांचा जुन्या गणवेशातच पहिला दिवस; मुख्यालयातील विभागप्रमुखांच्या उपस्थितीत रंगणार प्रवेशोत्सव

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये तीन लाख विद्यार्थ्यांची शनिवारी (ता. १५) शैक्षणिक वर्षाची सुरवात ही जुन्या गणवेशात होणार आहे.
Nashik ZP School News
Nashik ZP School Newsesakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये तीन लाख विद्यार्थ्यांची शनिवारी (ता. १५) शैक्षणिक वर्षाची सुरवात ही जुन्या गणवेशात होणार आहे. शाळा सुरू होण्याचा दिवस उजाडला असला, तरी अद्याप शासनस्तरावरून नवीन गणवेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीकडे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवाची शाळापातळीवर जोरदार तयारी सुरू असून, विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. (ZP School First day of students in old uniform)

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व विभागप्रमुख तालुकानिहाय शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. उन्हाळी सुटीनंतर शनिवारपासून पुन्हा नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा भरणार आहेत. त्यादिवशी ग्रामीण भागातील तीन हजार २०० प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. त्यात बालक, विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गोड खाऊ देऊन शाळांमध्ये स्वागत केले जाणार आहे.

त्यासाठीची सर्व तयारी शुक्रवारी (ता. १४) शाळांमध्ये सुरू होती. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत प्रवेशोत्सवाचा आढावा घेतला. शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पोचली असून, शनिवारी विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे संच वितरित केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत, तसेच पुस्तके मिळणार असले तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मात्र मिळू शकलेले नाहीत.

गेल्या वर्षी झालेल्या गोंधळामुळे गणवेश वाटपात बदल करण्याचा निर्णय घेत एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी शासनस्तरावरून कापड दिले जाणार व तालुकास्तरावर महिला आर्थिक विकास महामडंळाच्या बचत गटाच्या माध्यमातून गणवेशाची शिलाई करण्याचे निश्चित झाले. यात कापडच तालुकास्तरावर पोचले नाही. (latest marathi news)

Nashik ZP School News
Nashik News : शाळेचा पहिला दिवस होणार अविस्मरणीय; शैक्षणिक जागृतीसाठी शिक्षकांचा पुढाकार

त्यावर शासनाने गणवेश शिलाई करून देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, शाळा सुरू होण्याचा दिवस उजाडला असला, तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शासनाच्या गलथान कारभारामुळे नवीन गणवेश शाळांपर्यंत पोचू शकलेले नसल्याने विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात शाळेत प्रवेश करावा लागणार आहे.

तालुकानिहाय विभागप्रमुखांची झालेली नियुक्ती

शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागप्रमुखांना शाळांवर जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागप्रमुखांनी तालुक्यातील एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात सहभागी व्हावे तसेच अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील (नाशिक), जलजीवन मिशन प्रकल्प संचालक दीपक पाटील (इगतपुरी), ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ (त्र्यंबकेश्वर), महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील (पेठ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (सुरगाणा), कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे (दिंडोरी), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे (कळवण).

Nashik ZP School News
Nashik News : शाळा 2 दिवसांवर; ना कापड, ना मापे! शिक्षक संघटनांची नाराजी

प्रभारी शिक्षणाधिकारी (योजना) प्रकाश अहिरे (देवळा), प्रथामिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव (चांदवड), जिल्हा कृषी अधिकारी माधुरी गायकवाड (मालेगाव), कार्यकारी अभियंता शैलदा नलावडे (नांदगाव), जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे (येवला), जिल्हा समाजकल्याण अधिकारी (निफाड), प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रदीप चौधरी (सिन्नर).

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

बागलाण (१९ हजार ५३१), चांदवड (१४ हजार ८९१), देवळा (आठ हजार ४९८), इगतपुरी (२१ हजार २७३), कळवण (१३ हजार ३४२), मालेगाव (२८ हजार ४८६), नांदगाव (१८ हजार ६४७), नाशिक (१३ हजार ४९१), निफाड (२३ हजार ६१७), पेठ (१३ हजार २५०), सिन्नर (१८ हजार ६९१), सुरगाणा (१६ हजार ३२२), त्र्यंबकेश्वर (१५ हजार ९८९), येवला (१७ हजार)

Nashik ZP School News
Nashik News : गुळगुळीत फरशीने होताहेत अपघात; बाथरूम सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com