.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर बी.एड., डी.एड. झालेल्या तरुणांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात गतवर्षी अशा शाळांची संख्या १४२ होती. यंदाची शाळांची संख्या अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र, रिक्त जागांचा विचार करता अशा प्रकारे सुमारे १५०-२०० शिक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nashik ZP School Open to BEd DEd)