नाशिक- जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. संवर्गनिहाय बदली पूर्ण होण्यासाठी अजून महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे या शिक्षकांना दिवाळी सुटीतच कार्यमुक्त केले जाईल, अशी शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे.