नाशिक- आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने जीवनमान बदलत आहे. त्यामुळे करिअरचा विचार करताना भविष्याचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील काही वर्षांत कुठल्या क्षेत्रात वाव असेल, याचा अंदाज घेत काळानुरूप कौशल्ये आत्मसात करत यशस्वी करिअर घडवा, असा सल्ला विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शनिवारी (ता. ३१) येथे दिला.