सिडको- औद्योगिक वसाहतीमधील ‘ट्रॅक कंपोनंट्स’ कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने ‘चड्डी मोर्चा’ सुरू केला आहे. या मोर्चाची सुरवात सोमवारी (ता. २) कामगार उपायुक्त कार्यालय येथून झाली. मोर्चा थेट मंत्रालय, मुंबईकडे कूच करीत आहे. सायंकाळी हा मोर्चा वाडीवऱ्हेपर्यंत पोचला होता.