नवीन नाशिक- नाशिक शहरातील धरणे पुरेशी भरलेली असूनही सिडकोतील माउली लॉन्स, अंबड परिसरात काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या रोजच्या वापरासाठी असणारे पाणी पुरेसे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. एका बाजूला तीव्र पाणीटंचाईने तोंड वर काढले असून, दुसऱ्या बाजूला जलवाहिन्या फुटत आहेत. तसेच, व्हॉल्व्ह ओव्हरफ्लो होत असल्याने पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे.