घोटी- मुंबई-नाशिक महामार्गावरील टाके-घोटी शिवारातील भारत पेट्रोलियमच्या पंपावर सीएनजी गॅस मिळवण्यासाठी दररोज शेकडो वाहनांची लांबच लांब रांग लागलेली दिसते. सीएनजी मिळवण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे..इगतपुरी तालुका हा विविध मोठ्या प्रकल्पांनी बाधित झाला असून, अनेक कुटुंबांवर भूसंपादनाची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. अशा परिस्थितीत अनेक प्रकल्प बाधित तरुणांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घोटी-इगतपुरी, कसारा-नाशिक, घोटी-नाशिक या मार्गांवर रिक्षा व खासगी चारचाकी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू केली आहे..मात्र, मुंबई-नाशिक महामार्गावर सध्या केवळ दोनच सीएनजी पंप कार्यरत असून, आणखी तीन पंप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सीएनजीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक तरुणांना वाहनधंदा सोडावा लागण्याची वेळ आली असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे..राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी विविध योजना राबवल्या असल्या, तरी प्रत्यक्षात दररोज लाखो वाहनांतून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. अशा स्थितीत मुंबई-नाशिक मार्गावर अधिक सीएनजी पंप तात्काळ सुरू करणे गरजेचे असल्याची जोरदार मागणी नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे..Pune-Bengluru Highway Traffic : पुणे- सातारा-बंगळूरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुटीच्या दिवशी प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले .‘सीएनजी’ टंचाईमुळे आमच्या वाहनचालक बांधवांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रांगेत उभे राहून दिवसाचा बराचसा वेळ वाया जातो. काही वेळा तर प्रवासीही मिळत नाहीत. या मार्गावर बंद अवस्थेतील ‘सीएनजी’ पंप तातडीने सुरू करावेत, आणि नवीन पंप मंजूर करून लवकरात लवकर सुरू करावेत, ही आमची प्रशासनाकडे ठाम मागणी आहे. नाही तर अनेक तरुणांना हा व्यवसाय सोडावा लागेल आणि बेरोजगारी वाढेल.’’- रतन आडॊळे, वाहतूक चालक- मालक संघटना, शिवसेना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.