नाशिक- ‘सीबीआय’च्या मुंबई शाखेची पोलिस अधिकारी असल्याचे भासवून साडेआठ कोटींचा अवैधरीत्या आर्थिक व्यवहार केल्याचे सांगत संशयित सायबर भामट्याने डॉक्टर महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ दाखवून त्यांना तब्बल ४८ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.