नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. १) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, यानिमित्त सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना वेग येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. विशेषकरून साधुग्रामचे कायमस्वरूपी भूसंपादन व विकास आराखड्याला चालना हे महत्त्वाचे विषय मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.