Crime News : तंटामुक्तीच्या अध्यक्षानेच केली तंटा निर्मिती; सख्ख्या भावाचा खून करून गावात खळबळ
Tragic Incident in Lakhmapur: Brother Kills Brother : लखमापूर शिवारात घडलेल्या भावाने भावाच्या खुनाच्या घटनेची माहिती घेताना पोलिस अधिकारी आणि घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ.
वणी- सख्ख्या भावाकडून सततची होणारी भांडणे व त्याच्यापासून होणाऱ्या सततच्या त्रासास कंटाळून व मनात राग धरून गावचा तंटामुक्तीचा अध्यक्ष असलेल्या भावाने त्रास देणाऱ्या भावावर चाकूने हल्ला करीत खून केल्याची घटना लखमापूर (ता. दिंडोरी) शिवारात घडली.