नाशिक- भारतीय सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आलेले असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करणे, बडतर्फ असल्याने सैन्याचा गणवेश परिधान करण्यास मनाई असतानाही गणवेश परिधान करून सैन्यदलाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होईल असे वक्तव्य करणे, तसेच सैन्यातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्यासाठी त्यांचे लक्ष विचलत करण्याच प्रयत्न करणाऱ्या बडतर्फ जवानाविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.