नाशिक- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी व बारावी तसेच जेईई, जेईई मेन्स या प्रवेश परीक्षांचे मोफत शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘सुपर ५०’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी यंदा दोन परीक्षा घेण्यात येणार आहेत. पहिली परीक्षा २२ जून रोजी तालुका स्तरावर होईल, तर अंतिम निवड चाचणी २९ जून रोजी जिल्हा स्तरावर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.