नाशिक- भारत इतिहासात कधीही राजकीय राष्ट्र नव्हते. राज्यघटनेमुळे भारत एक राष्ट्र होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ज्या दिवशी राज्यघटना संपेल; त्या दिवशी भारत हा विघटित होईल हे आपण लक्षात ठेवावे. त्यामुळे राज्यघटना जिवापाड जपावी लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.