घोटी- तहसील कार्यालय परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने उभारलेली प्रशासकीय इमारत वापरात आणली जात नसल्याने ती धूळखात पडून आहे, तर दुसरीकडे मुद्रांक विक्री केंद्र, खरेदी-विक्री कार्यालय आणि भूमिअभिलेख कार्यालय यांसारख्या शासकीय आस्थापना, वाहनतळ जागेअभावी नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.