नाशिक- अनेक युवकांचे गायक होण्याचे स्वप्न असते. स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला हवी, गाण्यांचे प्रकार समजून घ्यायला हवे. गायक होण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्तम गुरू शोधा. त्यानंतर तुमचे गायक होण्याचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास इंडियन आयडल फेम गायक हृषीकेश शेलार यांनी ‘सकाळ समीट- २०२५’ मध्ये सहभागी युवकांना दिला. तन्वी जानोरकर यांनी हृषीकेश शेलार यांची प्रकट मुलाखत घेतली.