सातपूर- मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील जिंदाल पॉलिफिल्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडविली आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिक तसेच अन्य लघुउद्योगांतील कामगारांचे प्राणही धोक्यात येऊ शकले असते. मात्र जिल्हा प्रशासन आणि शासकीय यंत्रणांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.