इगतपुरी शहर- इगतपुरी तालुका हा अतिदुर्गम व आदिवासीबहुल असून, पावसाळ्यात निसर्गात बहरणाऱ्या रानभाज्या व रानमेवा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी महिलांवर लोहमार्ग पोलिस व रेलसुरक्षा बलाकडून होणारा त्रास आणि दंडेलशाहीमुळे आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याने रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २६) आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वेस्थानकात मोर्चा काढण्यात आला.