Agriculture News : वादळामुळे जांभूळ उत्पादन अर्ध्यावर, दर किलोसाठी ४०० रुपये!
Impact of Weather on Jamun Yield This Season : वादळामुळे अनेक फले गळून खराब झाल्याने यंदा आवक घटली आहे. त्यामुळे दरवर्षी साधारणतः दोनशे रुपये किलो मिळणारे जांभळे यंदा ३०० ते ४०० रुपये किलोने विक्री होत आहे.
नाशिक- शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करणारे मधुमेहासाठी गुणकारी रानमेव्यातील एक महत्त्वाचे फळ म्हणजे जांभूळ होय. यंदा झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका या फळांनाही बसला आहे.