कळवण- तालुक्यातील नवी बेज शिवारात वळणावर ॲपे रिक्षा व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक होऊन ११ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर दुखापत असलेल्या कृणाल पवार, रवींद्र पवार, शोभा पवार, विशाल पवार या जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.