Padwa Pahat: आर्याच्या स्वरांनी नाशिककर मंत्रमुग्ध! पाडवा पहाट कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरवासीयांना सांगीतिक पर्वणी

Nashikkar enchanted by Arya ambekar vocals Musical entertainment for city dwellers on occasion of diwali Padwa Pahat event
Nashikkar enchanted by Arya ambekar vocals Musical entertainment for city dwellers on occasion of diwali Padwa Pahat eventesakal

Nashik Diwali Padwa Pahat : 'श्रीरामाच्या पुजेसाठी आज अयोध्या सजली...' हे गीत सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकरच्या सुरेल स्वरात कानी पडताच नाशिककर मंत्रमुग्ध झाले.

पाडव्याचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे शहरातील प्रमोद महाजन उद्यानात मंगळवारी (ता. १४) पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरांनी सजलेल्या संगीत मैफिलीला नाशिकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. (Nashikkar enchanted by Arya ambekar vocals Musical entertainment for city dwellers on occasion of diwali Padwa Pahat event)

दिवाळीत पाडव्याच्या निमीत्ताने शहरवासीयांना सांगीतिक पर्वणी लाभली. शहरातील अनेक भागांत भरगच्च अशा संगीत मैफिलींचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे शहरातील प्रमोद महाजन उद्यानात सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

'लक्ष्मी बारम्मा...', 'श्रीरामाच्य पुजेसाठी अयोध्या सजली','नरवर कृष्णा समान' यासह 'केवड्याच पान तू', माझा होशील ना, आई कुठे काय करते या मराठी मालिकांचे शिर्षक गीत श्रोत्यांच्या फरमाईशेने आपल्या सुमधुर स्वरांत आर्या आंबेकरने सादर केले.

सौरभ दफ्तरदार यांची सहगायक म्हणून साथ लाभली. संवादिनी वादन ईश्वरी दसकर तर रोहीत कुलकर्णी यांनी किबोर्ड वादन केले. अमोल पाळेकर, प्रथम कुलकर्णी यांनी तबला वादन केले.

Nashikkar enchanted by Arya ambekar vocals Musical entertainment for city dwellers on occasion of diwali Padwa Pahat event
Diwali Pahat 2023 : वाकडमधील दिवाळी पहाटला रसिक श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

दिगंबर सोनवणे यांनी पखवाज तर सुशिल केदारे यांनी ऑक्टोपॅड वादन केले. निलेश सोनवणे यांनी गिटार वादन केले. अभिजीत कुलकर्णी यांनी निवेदन केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. भारती पवार, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर, मनपा आयुक्त अशोक करंजकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आमदार देवयांनी फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यासह शासकिय, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.आमदार देवयानी फरांदे, डॉ. अपर्णा फरांदे, अजिंक्य फरांदे,सुनील फरांदे, स्वप्नील दिगडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. सुरेल गीतांच्या सादरीरकरणाचा नाशिककर रसिक श्रोते एकाग्रतेने आस्वाद घेत मंत्रमुग्ध झाले.

प्रमोद महाजन उद्यान कात टाकणार

पाडव्याच्या निमीत्ताने आयोजित संगीत कार्यक्रमा दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांनी प्रमोद महाजन उद्यान लवकरच कात टाकणार असल्याची घोषणा केली.

पुन्हा एकदा नव्या रुपात नाशिककरांना हे उद्यान पाहावयास मिळेल असे उपस्थितांना भाषणातून सांगितले. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Nashikkar enchanted by Arya ambekar vocals Musical entertainment for city dwellers on occasion of diwali Padwa Pahat event
Diwali Pahat 2023 : देशाच्या मातीलाही शिवरायांशिवाय पर्याय नाही; आमदार हरिभाऊ बागडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com