
नाशिक : हिवाळा तंदुरुस्तीसाठी अत्यंत पोषक समजला जाणारा मौसम आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्याचा मंत्र जपताना शहरासह उपनगरी भागामधील व्यायामशाळा, जिम, योग केंद्र, झुंबाच्या शिकवणीमध्ये नाशिककर भल्या सकाळी हजेरी लावत आहेत. अगदी शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून युवक, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आहे. यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याच्या थंडीने झलक दाखविली आहे.