निफाड- शेतकऱ्यांना सरकारकडून रासायनिक खतांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र खरीप हंगाम २०२५ च्या पार्श्वभूमीवर बाजारात खतांचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निफाड तालुक्यात २२ हजार ३८४ टन खताचे आवंटन मंजूर झाल्याबाबतची माहिती कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली आहे.