Nashik Kumbh Mela : महिला, बालकांची सुरक्षितता महत्त्वाची! कुंभ आराखड्याला डॉ. गोऱ्हे यांचा दिशा निर्देश

Religious Tourism, Infrastructure, and Cultural Integration : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा २०२७ संदर्भातील आढावा बैठक नाशिकमध्ये घेण्यात आली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वच्छतागृहे, हेल्पलाइन आणि निवासव्यवस्थेवर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Kumbh Mela
Kumbh Melasakal
Updated on

नाशिकरोड- नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com