Nashik Crime News : बालगुन्हेगारीचा वाढता छडा : नाशिकच्या दरोड्यात तिघे अल्पवयीन सहभागी

Police Investigation and Crackdown : म्हसरूळ पोलिसांनी दरोड्यातील सहा संशयितांना अटक केली असून त्यामध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. ही कारवाई २४ तासांत करण्यात आली.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक, पंचवटी,- दोन दिवसांपूर्वी किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकारनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकावर हल्ला करीत परिसरातील वाहनाची तोडफोड करीत जबरी लूट केल्याची घटना घडली होती. यातील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. यात तीन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com