सटाणा- केळझर (ता. बागलाण) येथे शौचासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेच्या विजेचा शॉक लागून जागीच दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सटाणा पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.