नाशिक- कॉलेज रोड पट्ट्यावर रिक्षा चालविणाऱ्या तरुणाने अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांनीही शहरातून पलायन केले. जवळचे पैसे संपल्यानंतर मात्र त्याने त्याचे रंग दाखविणे सुरू केले. अल्पवयीन मुलीचा छळ करून त्याने तिच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली. प्रकरण सरकारवाडा पोलिसांत पोचल्यानंतर पोलिसांनीही संशयित युवकाला रिसोड (जि. वाशीम) येथून शिताफीने अटक करत मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली.