नाशिक- नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी ने-आण करणाऱ्या शहर मुख्यालयाच्या कैदी पार्टीची कारागृहाकडे परतत असताना संशयित कैद्यांबरोबर उपनगर हद्दीतील हॉटेलमध्ये ‘ओली पार्टी’ सुरू होती. त्याचवेळी सहायक आयुक्तांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून कैदी पार्टीचा भांडाफोड केला. या घटनेने शहर मुख्यालयाच्या कैदी पार्टीचे सर्वच अंमलदार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.