नाशिक- ‘‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इतर बँकांत विसर्जित होणार नाही, आणि तिला बरखास्त करण्याचे कोणतेही शासन धोरण नाही,’’ अशी स्पष्ट ग्वाही महाराष्ट्र सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. जिल्हा बँकेचे सक्षमीकरण हे राज्य शासनाचे प्राधान्य असून, अडकलेल्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असून, त्यावरील व्याज देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.