नाशिक- कौटुंबिक कलह, अभ्यासाचा ताणतणाव तर बहुतांश प्रेमप्रकरण, यामुळे मुले-मुली घर सोडून जाण्याचे प्रमाण काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. पोलिसदप्तरी बेपत्ता वा अपहरण या कलमांखाली रोज सरासरी किमान सहा गुन्ह्यांची नोंद होते. घर सोडून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ सुरू केले असून, या माध्यमातून शहर पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने २८ दिवसांत ८७ मुला-मुलींना शोध घेऊन परत आणले आहे. घरवापसी हे प्रमाण सरासरी पाच आहे.