त्र्यंबकेश्वर/नाशिक, ता. ९ : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी व दिंडी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (ता. १०) दुपारी दोनला त्र्यंबकेश्वर येथील समाधीस्थळावरून होणार आहे. या पारंपरिक व भक्तिभावपूर्ण सोहळ्याची सुरुवात कुशावर्त तीर्थावर नाथांच्या पादुकांच्या जलाभिषेकाने होईल.