नाशिक - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.