येवला- वाढलेले आजार आणि त्यावर असलेल्या असंख्य उपायांमुळे आता गोळ्या-औषधांच्या बाबतीत नागरिक जास्त दक्ष झाले आहेत. अनेकांना गोळ्यांचा इलाज व उपयोगांनी फायदा व दुष्परिणाम जाणून घेण्याची उत्सुकता असते. नागरिकांच्या याच गरजेतून एकलहरे येथील मातोश्री फार्मसी महाविद्यातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी एक अनोखे इंटरॅकमेड अॅप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना गोळ्या-औषधांचे उपयोग व दुष्परिणाम सहजरीत्या समजू शकणार आहेत.