वाडीवऱ्हे- नाशिक- मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण करणाऱ्या पाडळी देशमुख जवळील सीडीएस कंपनीबाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणाऱ्या मिलरने एका दुचाकीस्वाराला फरपटत नेत कमरेवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला..महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या सीडीएस या कंपनीत काँक्रिटचे मटेरिअल घेऊन येणाऱ्या मिलरने दुचाकी चालक सोमनाथ गंगाराम खडके (२०, रा. पिंपळगाव भटाटा) यांना चिरडले. श्री. खडके वाघोबावाडीकडून महामार्गाकडे दुचाकीने (एमएच १५, सीबी ४६२८) जात असताना काँक्रिटीकरणाचे मिलर (एमएच १५, जेडब्ल्यू १४८९) धडक देत सोमनाथ याला फरफटत नेत त्याच्या कमरेवरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर गाडीचालक तसेच कंपनीतील सर्व कामगारही पळून गेल्याने वातावरण काही काळ तापले होते..मृत सोमनाथ खडके याचे काका गोविंद हंबीर, नारायण हंबीर व मावसभाऊ सागर हंबीर यांनी त्याच्या कुटुंबाला मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह न नेण्याचा पवित्रा घेतल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. .Nashik Crime : गुन्हेगारीविरोधात पोलिसांची धडक मोहीम; म्हसरूळला सराईत गुंडांची धिंड.गोंदे येथील नरेंद्रचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास ५ ते ६ महिने झाले, मात्र सीडीएस कंपनी अगदी मनमानी पद्धतीने काम करीत आहे. अनेकदा ओरड होऊनही कंपनी कामात गती आणत नाही, त्यावर कुणाचाही वचक नसल्याने दररोज अपघात घडत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.