नाशिक रोड- मध्ये रेल्वेने प्रवास करणारे देवेंद्र चंपालाल पाटील (वय २५, रा. साईशंकरनगर साईबाबा मंदिराच्यामागे भुसावळ, जि. जळगाव) गुरुवारी (ता. १७) मुंबई ते भुसावळ, असा प्रवास करत असताना प्रवासादरम्यान नाशिक रोड रेल्वेस्थानकावर झोपेतून उठल्यावर त्यांच्या लक्षात आले, की त्यांची एक काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग त्यात डेल कंपनीचा काळ्या रंगाचा लॅपटॉप (किमत ८० हजार), एचपी कंपनीचा सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप (७५ हजार), दोन चार्जर, एक मोबाईल चार्जर, एक ब्राऊन रंगाचे पाकीट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, चेकबुक असा एकूण एक लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने झोपेचा फायदा घेऊन चोरी केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक रोड पोलिस ठाणे येथे फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात केला होता.