निखिल रोकडे : नाशिक- जगामध्ये मानवता, सेवाभाव या तत्त्वावर गौतम बुद्धांनी धम्म सांगितला. जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. यामध्ये प्रगतिशील राष्ट्रांचा प्रामुख्याने समावेश आहे..नाशिकमध्ये बौद्ध धर्माच्या इतिहासातील अनेक पाऊलखुणा प्राचीन काळापासून दिसून येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा ही येवला नाशिक जिल्ह्यातीलच आहे. त्यामुळे अनुयायानमार्फत अनेक उपक्रम व परिषदा राबविल्या गेल्या आहेत..विपश्यना केंद्रधम्मगिरी, ज्याचा अर्थ ‘धम्माचा पर्वत’ असा होतो. हे जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्रांपैकी एक आहे. एस. एन. गोएंका यांनी स्थापना केलेली आहे. धम्मगिरी हे इगतपुरी शहरात असून, नाशिकपासून ४५ किमी आणि मुंबईपासून १३६ किमी अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गावर आहे. धम्मगिरी येथे वर्षभर अभ्यासक्रम आयोजित केले जातात. भारतात आणि जगभरातील अनेक देशांमध्ये अभ्यासक्रम आयोजित केले जातात..त्रिरश्मी पांडव लेणीनाशिक-मुंबई महामार्गावर पाथर्डी फाटालगत त्रिरश्मी टेकडीवर दगडात कोरलेल्या लेण्या आहेत, म्हणूनच त्यांना त्रिरश्मी लेणी म्हणतात. त्रिरश्मी पांडव लेणी महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. सातवाहन, कलचुरी आणि वाकाटक या घराण्यांतील राजांनी ही लेणी खोदलेली आहे. जवळपास २५० पायऱ्या असून, एकूण २४ बौद्ध लेणी आहेत. येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधीसत्व यांच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात कोरलेल्या आहेत. पांडवलेणी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे एक संरक्षित वास्तू आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायी येथे भेट देतात..बोधी वृक्षजून २०२३ मध्ये अनुराधापुराच्या मुख्य भिक्खूंना त्रिरश्मी लेणीच्या परिसरात बोधी वृक्ष लावण्यासाठी एका शाखा देण्याची विनंती केली. त्यानंतर अनुराधापूर येथील बोधी वृक्षाची एक शाखा श्रीलंकेतून भारतात आणण्यात आली. २४ ऑक्टोबर २०२३ ला विजयादशमीच्या निमित्ताने त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी बुद्धस्मारक स्तूपाच्या परिसरात बोधी वृक्ष लावण्यात आला. बोधी वृक्ष रोपण नियोजन कार्यक्रमाला ‘ऐतिहासिक महाबोधी वृक्ष महामहोत्सव २०२३’ असे नाव देण्यात आले..शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि श्रीलंका, तसेच थायलंड, कंबोडिया, नेपाळ आणि मलेशिया येथील अनेक भिक्खू, उपासक उपस्थित होते. भगवान बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. बौद्ध उपासकाला बुद्धांचे स्मरण होईल, या उद्देशाने भिक्खूंनी नाशिकमध्ये हा बोधी वृक्ष लावला आहे..येवल्यातील धर्मांतराची घोषणा ३ ऑक्टोबर १९३५ ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मुक्तिभूमी साकारण्यात आली आहे. बौद्ध धर्मियांसाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे स्थळ आहे. .धम्माची शिकवण नाशिक रोड येथील बुद्धविहार व वाचनालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. हनुमंत उपरे व लक्ष्मण माने यांनीही नाशिकमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी विशेष प्रयत्न केले. जगातील प्रमुख देशातील भिक्खू नियमितपणे नाशिकमध्ये भेट देतात..Akola News : नवजीवन एक्सप्रेससमोर युवकाने संपवले जीवन; रेल्वे सेवा काही वेळ प्रभावित.नाशिक नगरीला बौद्ध धर्माचा प्राचीन वारसा आहे. दीडशे वर्षांच्या पूर्वी ब्रिटिशकाळात ब्रिटिश गॅझेटमध्ये बौद्ध भिक्खू नाशिकमध्ये वास्तव्यास होते व त्रिवृष्टी लेणीला प्रदक्षिणा घालत, असा उल्लेख केलेला आहे. - संतोष जोपूळकर, बौद्ध धर्म अभ्यास.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.