नाशिक- कार्यक्षेत्र कोणतेही असो, शहराविषयी इत्थंभूत माहिती असणारे व नाशिकचा चालता-बोलता संदर्भकोष म्हणून सर्वज्ञात असलेले मधुकर झेंडे (अण्णा) (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (ता. २६) पहाटे निधन झाले. .नाशिक नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होण्यासह सार्वजनिक वाचनालय नाशिक व अन्य संस्थांच्या उत्कर्षात मौलिक भूमिका बजावणाऱ्या झेंडे यांनी नाशिक महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. त्यांच्या मागे मुलगा राजेंद्र, दोन मुली रेखा व रत्ना, जावई प्रकाश पाटील व आल्हाद वाघ, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे..मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानाहून त्यांचे पार्थिव सार्वजनिक वाचनालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. त्यानंतर दुपारी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर दशरथ पाटील, ज्येष्ठ अभ्यासक कैलास कमोद, नाना महाले, हरिभाऊ शेलार, पद्माकर पाटील, सावाना कार्यकारी मंडळाचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. .अशाही आठवणी आणि प्रयोग थांबवला७ नोव्हेंबर १९८२ नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत होणार होते. त्याचा समारंभ प.सा. नाट्यगृहाच्या शेजारील शाळेच्या मैदानावर होणार होता पण अचानक जोरदार पाऊस सुरु झाला, अण्णा माझ्याकडे आले व म्हणाले, ‘जयाभाऊ, काय करता येईल?’ त्यावेळी प.सा. नाट्यगृहात ‘गगनभेदी’ नाटकाचा प्रयोग सुरू होता. रंगमंचावरून नाटक थांबविल्याचे मी जाहीर केले आणि प्रेक्षकांनी त्याला साथ दिली. कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा उर्वरित प्रयोग पार पडला. या प्रसंगाने अण्णा मला म्हणाले, ‘तू माझ्यापेक्षा लहान आहेस पण मी तुला दंडवत करतो.’- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यावसायिक.माणसं वाचणारा मनकवडालोकरंजन कला केंद्र नाट्य संस्थेचे अण्णा अध्यक्ष होते. त्या संस्थेचे ‘तो स्वप्नपक्षी’ नाटक राज्य नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून दुसरे आले पण अंतिमला मात्र पहिला क्रमांक घेतला होता. मला मार्गदर्शन हवे असल्यास मी हक्काने अण्णांकडे जायचो. त्यावर ते सर्व तपशील सांगायचे. नोकरीत त्यांनी कमी स्तरापासून कामाला सुरवात केली आणि हळूहळू ते मोठ्या पदापर्यंत पोहचले. माणसे वाचण्याची कला त्यांच्यात होती. हृदयनाथ मंगेशकर नाशिकमध्ये आल्यावर व्यासपीठावरून मधू झेंडे माझा मित्र असल्याचे आवर्जून सांगायचे.-मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ.सलोख्याचे संबंधमाझा १९७३-७४ पासून सार्वजनिक वाचनालयाशी संबंध आला आणि तिथेच अण्णांशी परिचय झाला. अण्णांचा सात नोव्हेंबर हा जन्मदिवस आणि नाशिक नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होणारा दिवस एकच आला. सावानाच्या गंगापूर रोड शाखेची सुरुवात अण्णांच्या मदतीने झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने असलेल्या तरण तलावाचे पहिले व्यवस्थापक अण्णा होते. महानगरपालिकेत तळागाळाच्या कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत त्यांचे सलोख्याचे संबंध होता.- ॲड. मिलिंद चिंधडे.श्रध्दांजली...समाजातील सर्व क्षेत्रात झेंडे यांचा वावर होता. त्यांनी जीव लावून माणसे तयार केली होती. आपल्या शहराविषयी त्यांना अभिमान होता. शहरात काही घटना घडल्यास संदर्भग्रंथ म्हणून झेंडे यांच्याकडे पाहिले जायचे. ते इतिहास संशोधक नव्हते पण, कोणतीही माहिती पुरविण्यात नेहमी पुढे असत. -उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक.अण्णा गेल्यामुळे गेल्या अनेक दशकांचा नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आपल्यातून गेला. मी त्यांना सावानाचा वास्तुपुरुष म्हणत असे. मनपा, सावानाच नाही तर गावातल्या सगळ्याच सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांवर त्यांनी जिवापाड प्रेम केले.-प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष, सावाना.नाशिकचा चालता बोलता माहितीकोष म्हणून प्रसिद्ध असणारे मधुकर झेंडे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. झेंडे कुटुंबीयांच्या या दुःखात भुजबळ परिवार सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.-छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री.गेली ४० वर्ष झेंडे हे वसंत व्याख्यानमालेच्या विविध पदांवर कार्यरत होते. २००१ साली ७८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी गानसमाज्ञी लता मंगेशकर झेंडे यांच्या खास आग्रहास्तव आल्या होत्या.-श्रीकांत बेणी, अध्यक्ष, वसंत व्याख्यानमाला.एकदा अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला असता त्या वादात अण्णांना विनंती करून अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर अण्णांनी परिषदेत झालेले गैरसमज सहजतेने हाताळून सर्वांना एकत्र आणले. कालिदास कलामंदिर उभारण्यात अण्णांचा मोलाचा वाटा होता.-प्रा. रवींद्र कदम,अध्यक्ष, अ भा नाट्य परिषद.झेंडे यांच्या निधनामुळे जनसंपर्काचा दीपस्तंभ हरपला. कार्यालयात भेटायला आलेले लोकप्रतिनिधी, जुने जाणते व्यक्ती आवर्जून अण्णांची आठवण काढायचे. त्यांच्यासारखा जनसंपर्क प्रस्थापित करणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.-योगेश कमोद, जनसंपर्क अधिकारी, महापालिक.भूषविलेली पदे२००८ ते २०१२ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष२००७-२००८ अ. भा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष४० वर्ष वसंत व्याख्यानमालेच्या विविध पदांवर कार्यरतमोहन मास्तर तालमीत शरीर कमावून कुस्त्यांचे फड गाजविले.Ajit Pawar : निधी वाटपात गडबड झाल्यास सोडणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सज्जड दम, अधिकाऱ्यांची पाचावर धारण.‘सकाळ’मधील ‘माझं नाशिक’ सदर१९९५ मध्ये झेंडे यांनी ‘सकाळ’मध्ये ‘माझं नाशिक’ नावाने दीर्घ मालिका लिहिली होती. शहरातील सर्व प्रमुख परिसर, दिग्गज व्यक्तिमत्त्व, साहित्यिक, कलावंत, त्याचबरोबर रविवार कारंजाचा इतिहास, महापालिकेची इमारत कशी उभी राहिली? नवीन नाशिक-जुनं नाशिक ही नावे का आणि कशी पडली, याविषयी या सदराच्या माध्यमातून विपुल लेखन केले. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.