वणी- आद्य स्वयंभू शक्तीपिठ असलेल्या सप्तश्रृंगी देवी गडावरील घाट रस्त्यावर सोमवारी, ता. १९ रोजी सांयकाळी गणपती टप्प्याजवळील भागात भाविकांच्या कारवर दरड पडल्याची घटना घडली असून दैव बलवत्तर म्हणून कारमधील सहाही जण बचावले आहेत. मात्र झालेल्या दुर्घटनेत कारचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे वाहनावर पडलेला दरड हा रॉकफॉल बेॅरीअरच्या खालून आल्याने घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधात्मक केलेल्या उपाययोजनेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.