नाशिक- ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची योग्यता इतकी व्यापक आहे, की त्यांना एक नव्हे, तर चार भारतरत्न मिळाले तरीही ते थोडेच ठरतील,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले. भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिरासमोर आयोजित तेजोमयी हिंदुत्व व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.