नाशिक- गंगापूर रोड परिसरात रखवालदार असलेल्या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेतला असता, नातलगांनी पोलिसांना न कळविताच मृतदेह मूळगावी अंत्यविधीसाठी नेला; परंतु शरीरावर संशयास्पद खुणा असल्याची माहिती मिळताच हरसूल पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. पण, विच्छेदनातून मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या प्रकारामुळे ग्रामीणसह गंगापूर पोलिसांचीही चांगली धावपळ उडाली.