नाशिक- ठाकरे सेनेला मोठे भगदाड पडून मोठे नेते अनुक्रमे भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने दोन दिवस नाशिकचे वातावरण तापले आहे. यानंतर ज्या पक्षात प्रवेश करणार आहे, त्या पक्षातदेखील अंतर्गत खदखद वाढली आहे. भाजप आमदार सीमा हिरे यांनी उघड विरोध करताना पक्षश्रेष्ठींच्या कानावर नाराजी पोचविली आहे. तर शिवसेनेत (शिंदे) देखील प्रवेशावरून नाराजीचा सुर आहे. त्यामुळे भाजप व शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेला वाकुल्या दाखविल्या जात असल्या तरी महायुतीतील सत्ताधारी पक्षात ‘इनकमिंग’वरून मोठी नाराजी असल्याचे दिसून येत आहे.