नाशिक- जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांच्या दुसऱ्या टप्प्यात १९० कर्मचाऱ्यांनी अंशत: बदलीसाठी प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आता विभागप्रमुखांकडून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांकडे परवानगीसाठी पाठविण्यात येणार आहे.