अभाविपच्या ‘राष्ट्रतेजा’ युवती संमेलनात युवतींच्या नेतृत्वगुणांना नवे व्यासपीठ

अभाविपच्या ‘राष्ट्रतेजा’ युवती संमेलनात युवतींच्या नेतृत्वगुणांना नवे व्यासपीठ
Published on: 
NSK26H31922 पथराई : नवतेजा संमेलनात बोलताना डॉ. विभुती गावित. शेजारी चंद्रकला गावित, दीपाली चित्ते, कल्याणी डांगे आदी. --- ‘अभाविप’च्या ‘राष्ट्रतेजा’ युवती संमेलनात युवतींच्या नेतृत्वगुणांना मिळाले व्यासपीठ नंदुरबार, ता. ११ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित ‘राष्ट्रतेजा युवती संमेलन’ पथराई येथील के. डी. गावित महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. संमेलनात युवतींमधील नेतृत्वगुणांना वाव देऊन आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. तसेच सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्माणात युवतींची भूमिका अधोरेखित करण्यात आली. संमेलनाच्या उद्‍घाटन सोहळ्यास माउंट एव्हरेस्ट वीरांगणा चंद्रकला गावित यांची प्रमुख पाहुमे म्हणून उपस्थिती होती. अभाविपच्या देवगिरी प्रदेश सहमंत्री दीपाली चित्ते, स्वागत समिती अध्यक्ष कल्याणी डांगे, स्वागत समिती सचिव तथा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. विभुती गावित, शहर सहमंत्री रक्षिता महाजन, संमेलनप्रमुख यामिनी वसईकर उपस्थित होते. ऋग्वेदा जोशी हिने स्वागतगीत म्हटले. विद्यार्थिनींना आपल्या क्षमता ओळखण्याची, समाजाप्रति जबाबदारी समजून घेण्याची आणि विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्याची प्रेरणा संमेलनात देण्यात आली. युवतींनी शिक्षणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग आवश्यक आहे. युवती कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात, हा संदेश संमेलनातून देण्यात आला. कार्यक्रमातील मुलाखत सत्र विशेष आकर्षण ठरले. संमेलनाला नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वितेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्ते आणि आयोजन समितीने परिश्रम घेतले. रोशनी सामुद्रे, सायली साठे, स्वाती फुलपगारे, पूजा राठोड, सायली शित्रे, तोषवी बारी, युक्ती पाठक, यादिनी पाटील, रिया घोष, भाग्यश्री पाटील, हर्षदा माळी, तेजल पाटील, संशिता पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com