नाशिक रोडच्या डॉक्टरांना राष्ट्रीय संघटनेचा पुरस्कार | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. केतन देसाई युवा लीडर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले

नाशिक रोडच्या डॉक्टरांना राष्ट्रीय संघटनेचा पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतर्फे नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना डॉ. केतन देसाई युवा लीडर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नाशिक रोड शाखेच्या खजिनदार डॉ. स्वप्नांजली आव्हाड, सचिव डॉ. निशांत घोडके, सहसचिव डॉ. दीप्ती पापरीकर यांना हा पुरस्कार राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोग सदस्य डॉ. श्री. व्ही. के. पॉल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल, सचिव डॉ. जयेश लेले आदी या वेळी उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रात व आयएमए संघटनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा डॉक्टरांना हा सम्मान दिला जातो. डॉ. स्वप्नांजली आव्हाड व डॉ. दीप्ती पापरीकर या स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ असून, डॉ. निशांत घोडके हे त्वचारोग तज्ञ आहेत. त्यांचे जागतिक वैद्यकीय संघटनेचे खजिनदार डॉ. रवी वानखेडकर, आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. रवींद्र कुटे, नाशिक रोड अध्यक्ष डॉ. शीतल जाधव, उपाध्यक्ष डॉ. नितीन सुराणा, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. अनिल कानडे आदींनी अभिनंदन केले.

loading image
go to top