धुळे : टुडे पान ४ साठी....
--
फोटो क्रमांक : 33676
नगाव (ता. धुळे) : गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट महाविद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देताना आरोग्य विभागाचे कर्मचारी. शेजारी मान्यवर.
--
बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशक मोहीम उपयुक्त
--
उपजिल्हाधिकारी संदीप पाटील : जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : लहान मुलांमध्ये होणारा जंतसंसर्ग त्यांच्या शारीरिक वाढीवर, पोषणावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. आतड्यातील जंतसंसर्गावर नियंत्रण मिळवून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम उपयुक्त आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांपर्यंत जंतनाशक गोळ्या पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी केले.
नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगाव शिक्षण संस्थेच्या सहकार्याने या मोहिमेस त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) अजय फडोळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, साथरोग अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, प्राचार्य आर. एच. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील, डॉ. हर्षदा पवार उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ३९ हजार ६३१ बालक-किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये तसेच अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. ज्या बालकांना २७ ऑक्टोबरला गोळ्या घेता आल्या नाहीत, त्यांच्यासाठी तीन नोव्हेंबर रोजी ‘मॉप-अप राऊंड’ आयोजित केला जाणार आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
मोहिमेचा लाभ घ्या
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी मोहिमेच्या अंमलबजावणीची माहिती दिली. जिल्ह्यातील जोखीमग्रस्त क्षेत्रे, वीटभट्ट्या, बांधकाम स्थळे तसेच भटक्या समूहांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तेथील पात्र लाभार्थ्यांची यादी निश्चित करून आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या घटकांपर्यंत गोळ्या पोहोचवण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले. पी. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष पाटील यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी आभार मानले. प्राथमिक आरोग्य केंद्र नगाव येथील आरोग्य कर्मचारी, शिक्षक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पात्र बालक- किशोरवयीन मुला- मुलींनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.