नाशिक- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन असूनसुद्धा जिल्ह्यात फक्त जून महिन्याचेच शंभर टक्के वितरण पूर्ण झाले आहे. जुलै महिन्याचे केवळ ५१ टक्के धान्यच सध्या उचलण्यात आले असून, पुरवठा विभागाने उर्वरित जुलै व ऑगस्ट महिन्यांचे धान्य लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.