

सटाणा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात पालिकेसमोर असताना आंदोलन छेडताना नगराध्यक्ष हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक राहुल पाटील आदींसह वकील संघाचे पदाधिकारी. (छाया : रोशन खैरनार)
Sakal
सटाणा : शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेले पालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी आज अखेर प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेसमोरील शिवतीर्थ परिसरात रास्ता रोको आंदोलन छेडत “काम सुरू करा, अन्यथा कारवाईला सामोरं जा...” असा थेट इशारा वेळकाढूपणा करणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाला दिला. लोकप्रतिनिधींच्या या आंदोलनाला वकील संघाने पाठिंबा देत त्यात सहभाग घेतला. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक दुतर्फा पूर्णपणे ठप्प झाली होती. अखेर शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.