सोमवारचा कॉलम निमित्त

सोमवारचा कॉलम निमित्त
Published on: 
टुडे पान एकसाठी --------------- लोगो : निमित्त/सचिन जोशी ----------------- शीर्षक... रस्ते विकास.. कंत्राटदारांचं ‘भलं’ अन्‌ वाहनधारकांची बिकट वाट! -------- इंट्रो... ‘रस्ते हे विकासाचे राजमार्ग असतात,’ असे म्हटले जाते. पण कंत्राटदारांच्या आणि त्या माध्यमातून स्वत:च्या लाभासाठी जेव्हा रस्ते तयार केले जातात, तेव्हा हेच रस्ते सामान्य वाहनधारकांसाठी मृत्युचा मार्ग ठरतात. सध्या जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३बाबत असेच म्हणता येईल. या महामार्गावरील फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणासह जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचा एकूणच आराखडा, कामाचा दर्जा पाहिला तर तो वाहनधारकांच्या जिवावर उठणाराच आहे. महामार्गावरील वळणरस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे एका अतिवृष्टीत खचणे व त्यानंतरच्या तीन महिन्यांतही तो पूर्ववत न होणे, शहरातील महामार्गाची दुरवस्था हे प्रकार नितीन गडकरींसारख्या ‘व्हीजनरी’ नेत्याच्या अखत्यारितील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गुणवत्तेला आव्हान देणारे आहेत... ----- पायाभूत सुविधांमुळे होणारा विकास गतीने होतो, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच रस्ते वाहतूक या महत्त्वपूर्ण विभागाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नितीन गडकरींसारख्या अत्यंत सक्षम नेत्यावर सोपवली. गडकरींच्याच कार्यकाळात जळगाव जिल्ह्यातील चारही बाजूंना चौपदरी रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले, हे कुणी नाकारू शकत नाही. दक्षिणोत्तर जळगाव- छत्रपती संभाजीनगर, आणि पूर्व-पश्‍चिम बाजूंना जोडणारा अमरावती-नवापूर चौपदरी महामार्ग हा गेल्या दहा वर्षांतील मोठी उपलब्ध मानली पाहिजे. त्यात आता बऱ्हाणपूर-तळोदा-अंकलेश्‍वर महामार्गाच्या प्रस्तावित चौपदरीकरणाची भर पडणार आहे. गुजरात-खानदेश-विदर्भ या टप्प्यातील वाहतूक सुलभ, गतिमान व सुरक्षित होण्याच्यादृष्टीने फागणे-तरसोद-चिखली या दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण २ हजार कोटींच्या खर्चातून करण्यात आले. एकीकडे तरसोद-चिखली रस्त्याचे चौपदरीकरण अत्यंत गुणवत्तापूर्ण झालेले असताना फागणे-तरसोद टप्प्यातील कामाबाबत सुरवातीपासूनच तक्रारी होत गेल्या. ३१ जुलैस या महामार्गाच्या वळण रस्त्यावरील (पाळधी-तरसोद बायपास) असोदाजवळील रेल्वेउड्डाणपुलाचा भाग अतिवृष्टीमुळे खचला. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असताना किरकोळ पावसामुळे पुलाचा भाग खचणे ही खरेतर गडकरींच्या रस्ते वाहतूक विभागासाठी लाजीरवाणी बाब. मात्र, कामाच्या सुरवातीपासूनच त्याचा दर्जा राखला गेला नसेल तर या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल बनविताना (डीपीआर), त्याची अंमलबजावणी होऊन काम प्रत्यक्ष सुरु होताना व नंतर ते पूर्ण होईपर्यंत त्याच्या गुणवत्तेवर ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी नेमके काय लक्ष ठेवले? हा प्रश्‍न आहे. उड्डाणपुलाचा भाग खचल्याने हा वळणरस्ता एक ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, तो आजपर्यंत सुरु झालेला नाही. तीन महिने उलटले. वाहतुकीस बंद असताना त्यावरून काही वाहने जाऊन अपघात घडले व दोन- चार लोकांचा बळी गेला. काही दिवसांपूर्वी एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली, परंतु त्यासाठी पुरेशा उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. त्यामुळेच हा रस्ता अपघातप्रवण बनला आहे. दुसरीकडे तो बंद असल्याने शहरातून जळगाव शहरातून वाहतूक वळविण्यात आली. शहरातील महामार्गही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्याच कंत्राटदारावरील ‘कृपे’ने अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालांय. या रस्त्याच्या प्रारंभिक आराखड्यापासून त्याचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत झालेले काम हे अभियांत्रिकीचा निकृष्ट नमुना म्हणावा लागेल. म्हणूनच या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षभरातच त्याची दुरवस्था झाली आणि विशेष म्हणजे, दोष दायित्व कालावधी संपण्याआधीच त्याच्या मजबुतीकरणासाठी पुन्हा कोटींचा खर्च करावा लागत आहे. शिवाय, दुरवस्था, नियोजनशून्यता व निकृष्ट दर्जामुळे या रस्त्यावर झालेल्या अपघातातील मृतांच्या आयुष्याची किंमत कशी करणार? विकासाचा राजमार्ग म्हटल्या जाणाऱ्या या रस्त्यांची वाट लावणारी प्रशासकीय यंत्रणा व कंत्राटदारांच्या ‘रॅकेट’वर अपघातातील मृतांच्या आयुष्याचे, रस्तेकामावर झालेल्या खर्चाचे दोष दायित्व निश्‍चित करणे गरजेचे आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com